Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?
मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?
पर्याय (Options):
A
लक्ष वेधून घेणे
B
शिकस्त करणे
C
अचूक उत्तर (Official Answer)
वेठीस धरणे
D
शरपंजरी पडणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना वेठीस धरणे या वाक्प्रचारातून व्यक्त होते.
वेठीस धरणे म्हणजे अडवून ठेवणे होय.
वाक्यात उपयोग - जमीनदार नेहमी शेतमजुरांना वेठीस धरण्याचे काम करत असत.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• लक्ष वेधून घेणे म्हणजे एखाद्याचे मन वेधून घेणे होय.
• वाक्यात उपयोग - वक्त्याने आपल्या बोलण्याने सर्व श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
• शिकस्त देणे म्हणजे पराभव करणे होय.
• वाक्यात उपयोग - अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला शिकस्त दिली.
• प्रयत्नाची शिकस्त करणे म्हणजे आटोकाट प्रयत्न करणे होय.
• वाक्यात उपयोग - अविने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली.
• शरपंजरी पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची सर्व शक्ती आणि सामर्थ्य संपणे होय.
• वाक्यात उपयोग - अंगात घुसलेल्या बाणांमुळे भीष्म पितामह युद्धभूमीवर अक्षरशः शरपंजरीच पडले होते.