MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढीलपैकी कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्यरचना शोधा.

पुढीलपैकी कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्यरचना शोधा.

पर्याय (Options):
A

मोहन शाळेत जातो

अचूक उत्तर (Official Answer)
B

अमित पडला

C

कुशलने बनवला आकाश कंदील

D

झोका घेते अस्मिता

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रमाने असलेली वाक्यरचना मोहन शाळेत जातो ही होईल. मोहन शाळेत जातो या वाक्यात मोहन हा कर्ता आहे, शाळा हे कर्म आहे आणि जातो हे क्रियापद आहे. Important Notes: वाक्याचे खालील दोन विभाग पडतात. • उद्देश विभाग • विधेय विभाग उद्देश विभाग - • उद्देश (कर्ता) - वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. • उद्देश विस्तार - कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तार म्हणतात. विधेय विभाग/विधेयांग - • कर्म - वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते. • कर्म विस्तार - कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. • विधेयपूरक - कर्ता व क्रियापद सोडून इतर कोणताही शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तर त्या शब्दाला विधेयपूरक असे म्हणतात. • विधीपूरक - कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते विधीपूरक असते. • विधेयविस्तार - वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्‍या शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेयविस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात. • विधेय - क्रियापदास विधेय असे म्हणतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):