MPSC Test Logo mpsctest.in
History Socio-Religious Reform Movements & Reformers FMT-01
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

गोपाळ हरी देशमुखांबद्दल पुढे दिलेल्यापैकी कोणते/कोणती वाक्य/वाक्ये चुकीचे आहे/आहेत? (a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली. (b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे. (c) त्यांनी महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले. पर्यायी उत्तरे:

Which of the following sentence/s about Gopal Hari Deshmukh is/are INCORRECT? (a) He started the newspapers Induprakash, Lokhitavadi and Gyanodaya. (b) He was of the opinion that Indians should take their political rights from the British as the economic condition of the country would not improve unless the country was given independence. (c) They first imported sugarcane from Mauritius into Maharashtra. Alternative Answers:

पर्याय (Options):
A

फक्त (b) आणि (c)

B

फक्त (c)

C

फक्त (a)

D

फक्त (a) आणि (c)

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: गोपाळ हरी देशमुख (1823-1892): • महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. • लोकहितवादींचे नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इ. स. 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. • इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराथी, हिंदी इ. भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. • पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले. • त्यांना सरकारने 'रावबहादूर' ही पदवी दिली होती. • लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झाले. • भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला 'शतपत्रे' असे म्हणतात. • त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते. • 'लक्ष्मीज्ञान', 'गीतातत्व', 'जातिभेद', 'भरतखंडपर्व', 'भिक्षुक', 'लंकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन केले. • लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले. • भारतीय समाजाची जातिव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली. • उच्चवर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला. • समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विदया, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उदयोगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. • केवळ आणि धार्मिक सुधारणा करून देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही तर या सुधारणाशिवाय देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे असा विचार गोपाळरावांनी प्रस्तुत केला. • या ध्येय पूर्ततेसाठी जनतेने देशातील परकीय सत्ता हाकलून लावण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा गोपाळरावांनी जनतेसमोर विचर मांडला. म्हणून विधान (b) बरोबर आहे. लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा: • नाना शंकरशेठ महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले. म्हणून विधान (c) चुकीचे आहे. • विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदूप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले होते. गोपाळ हरी देशमुख यांनी या सप्ताहिकामधून लेखन केले होते. म्हणून विधान (a) चुकीचे आहे. • ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते. • हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले. • अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. • ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता.
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षेतील संभाव्य चूक: प्रश्नात 'नाही / अयोग्य' असा नकारात्मक शब्द विचारला आहे. अनेक विद्यार्थी घाईत सकारात्मक विधान समजून चुकीचा पर्याय निवडतात. येथे 'फक्त (a) आणि (c)' हे अचूक उत्तर आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

स्मृती क्लृप्ती: 'वर्ष 1823 = फक्त (a) आणि (c)'. आधुनिक भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासात वर्ष 1823 च्या संदर्भात 'फक्त (a) आणि (c)' ही प्रमुख घटना / व्यक्तिमत्त्व लक्षात ठेवा.

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

🎯 पर्याय बाद पद्धत (Option Elimination Strategy): • पर्याय 1 ('फक्त (b) आणि (c)'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर 'फक्त (a) आणि (c)' हे ठरते. • पर्याय 2 ('फक्त (c)'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर 'फक्त (a) आणि (c)' हे ठरते. • पर्याय 3 ('फक्त (a)'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर 'फक्त (a) आणि (c)' हे ठरते. • निष्कर्ष: त्यामुळे उर्वरित पर्याय बाद होऊन अचूक उत्तर पर्याय 4 ('फक्त (a) आणि (c)') निश्चित होते.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब — १००-प्रश्न संपूर्ण सराव मॉक टेस्ट 06

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):