सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
• 1 फेब्रुवारी 2022 रोजी, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 - 23 मध्ये क्रिप्टोकरन्सीबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पुढे क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. म्हणून, पर्याय (3) योग्य आहे.
• अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सर्व प्रकारच्या आभासी चलनाच्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात येणार आहे. क्रिप्टोकरन्सी जर कुणाला भेटवस्तूच्या स्वरुपात मिळाली असेल, तर ती स्वीकारणाऱ्याला कर भरावा लागेल, त्या पुढे म्हणाल्या की, डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी केलेल्या व्यवहारांवर 1% कर (TDS) देखील आकरला जाईल.
• अशा डिजिटल मालमत्तेच्या व्यवहारामुळे होणारे कोणतेही नुकसान इतर कोणत्याही फायद्यातून भरून काढता येणार नाही, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
• अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या भाषणात जाहीर केले की, देशाची मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), ब्लॉकचेन आणि इतर सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील आर्थिक वर्षात डिजिटल चलन सुरू करेल.
क्रिप्टोकरन्सी
• क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे, जे संगणकाच्या जाळ्याद्वारे हस्तांतरणाचे साधन म्हणून कार्य करण्यासाठी तयार केले गेले आहे; आणि ते समर्थन किंवा देखरेख करण्यासाठी सरकार किंवा बँक यांसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नसेल.
• बिटकॉइन हे क्रिप्टोकरन्सीचे पहिले चलन आहे, आणि आजही ते सर्वाधिक वापरले जाणारे, किफायतशीर आणि लोकप्रिय चलन आहे. 2009 मध्ये, "सतोशी नाकामोटो" या नावाने ओळखल्या जाणार्या व्यक्ती किंवा गटाने बिटकॉइन तयार केले होते.
• Finance Minister Nirmala Sitharaman unveiled the Union Budget 2022-23 on February 1, 2022, during which she stated that the central government will levy a 30% tax on virtual digital assets, putting cryptocurrencies and non-fungible tokens (NFTs) into the tax net. Hence option 3 is correct.
• The presents will be taxed in the recipient's hands, she added, adding that there will also be a 1% tax deducted at source (TDS) on payments made for the transfer of digital assets.
• It was also announced that any loss incurred as a result of the transaction of such digital assets may not be offset against any other gain.
• Finance Minister Nirmala Sitharaman announced in her Union Budget 2022 speech that the country's central bank, the Reserve Bank of India (RBI), will launch a digital currency in the next fiscal year using blockchain and other supporting technology.
Cryptocurrency
• A cryptocurrency is a digital currency that is designed to function as a means of exchange via a computer network and is not dependent on any central authority, such as a government or bank, to support or maintain it.
• Bitcoin was the first sort of cryptocurrency, and it is still the most widely used, lucrative, and popular today. Bitcoin was created in 2009 by an individual or group known as "Satoshi Nakamoto."