MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा: (a) 2011 साली 97 व्या घटनादुरुस्तीने 'सहकारी संस्था' हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. (b) अनुच्छेद 19(1)(c) मध्ये 'सहकारी संस्था' स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. (c) लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला.

Consider the following statements and choose the correct option : (a) The subject, 'Co-operative Societies' has been included in the Constitution of India by the 97^(th) Amendment in 2011. (b) The right to establish 'Co-operative Societies' is given in Article 19(1)(c). (c) The first law related to Co-operative Societies in India was passed during the tenure of Lord Curzon.

पर्याय (Options):
A

(a) आणि (c) बरोबर आहेत

B

(b) आणि (c) बरोबर आहेत

C

(a) आणि (b) बरोबर आहेत

D

तिन्ही विधाने बरोबर आहेत

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
सहकारी संस्था: • भारतीय संविधानातील भाग IX-B अंतर्गत, सहकारी संस्थांसंदर्भात खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत: • सहकारी संस्थांचे विधिसंस्थापन: या भागाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळास, कायद्याद्वारे, स्वेच्छापूर्वक निर्मिती, लोकशाही पद्धतीचे सदस्यीय नियंत्रण,सदस्यांचा आर्थिक सहभाग आणि स्वायत्त कारभार या तत्त्वांवर आधारित सहकारी संस्थांचे विधिसंस्थापन, विनियमन व समापन यांबाबत तरतुदी करता येतील. • 2011 मधील 97 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये, सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा आणि संरक्षण देण्यात आले. • या संदर्भात, संविधानात पुढील तीन बदल करण्यात आले: • अनुच्छेद 19(c) अन्वये, अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनविण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवला. • अनुच्छेद 43B अन्वये (राज्य धोरणाचे निदेशक तत्त्व), सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, स्वायत्त कारभार, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. • भारतीय संविधानामध्ये, अनुच्छेद 243-ZH ते 243-ZT अन्वये, “सहकारी संस्था” अशा एका नवीन शीर्षकाचा भाग IX-B जोडण्यात आला. • 1904 मध्ये, लॉर्ड कर्झन यांनी लोकांना संस्था स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सहकारी पतसंस्था कायदा संमत केला. • ठेवी आणि कर्जाचा उद्देश मुख्यतः शेतकर्‍यांना सावकारांच्या तावडीतून वाचवणे हा होता, जे सहसा शेतकऱ्यांवर जास्त व्याज आकारतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?