MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील तरतुदींचा विचार करा: a. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार, 'कायद्याच्या योग्य प्रक्रिये'शिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही. b. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 (2) नुसार एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला भरला जाणार नाही आणि शिक्षा दिली जाणार नाही. c. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 नुसार कोणत्याही कायद्याच्या आधी समानता किंवा भारताच्या हद्दीतील कायद्याचे समान संरक्षण करण्यास राज्य कोणत्याही व्यक्तीस नकार देऊ शकत नाही. वर दिलेल्या कोणत्या तरतुदी योग्य नाहीत?

Consider the following provisions : a. According to Article 21 of the Indian Constitution, no person shall be deprived of his life or personal liberty except according to the ‘due process of Law’. b. According to Article 20 (2) of the Indian Constitution, no person shall be prosecuted and punished for the same offense more than once. c. According to Article 14 of the Indian Constitution, the State shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India. Which of the provisions given above is not correct?

पर्याय (Options):
A

a

अचूक उत्तर (Official Answer)
B

b

C

c

D

वरीलपैकी काहीही नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर a आहे. अनुच्छेद 20 (2) • एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला भरला जाणार नाही व शिक्षा होणार नाही अनुच्छेद 21 • जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षणः कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीस त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. असे विधान 'a' अयोग्य आहे. अनुच्छेद 14 • कायद्यापुढे समानता: कोणत्याही कायद्यास समानता किंवा भारताच्या हद्दीत कायद्याचे समान संरक्षण यास कोणत्याही व्यक्तीस राज्य नाकारणार नाही. • हे धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थान या कारणास्तव भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते. पूरक माहिती: • मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेच्या भाग III (अनुच्छेद 12 ते 35) मध्ये अंतर्भूत आहेत. • भारतीय घटनेत सहा मूलभूत अधिकार आहेतः • समानतेचा अधिकार (अनुच्छेद 14-18) • स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद 19-22) • शोषणाविरूद्ध अधिकार (अनुच्छेद 23-24) • धर्माच्या स्वातंत्र्याचा हक्क (अनुच्छेद 25-28) • सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार (अनुच्छेद 29-30) • घटनात्मक उपायांचा अधिकार (अनुच्छेद 32)
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?