MPSC Test Logo mpsctest.in
History (इतिहास) Socio-Religious Reform Movements & Reformers FMT-01
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ आणि पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थांची स्थापना कोणी केली होती?

Who founded the organizations Marathi Granthotjeka Mandal and Paschim Bharat Industrial Association?

पर्याय (Options):
A

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

अचूक उत्तर (Official Answer)
B

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

C

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

D

गोपाळ गणेश आगरकर

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे: • जन्म 1842 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला होता. • न्या. रानडे रानडे यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. • पुणे शहरात स्थापन झालेल्या प्रत्येक संस्थेशी त्यांचा संबंध होता. • सार्वजनिक सभा, वकृत्वोत्तेजक सभा, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, सब जज्जांची परिषद, प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, म्युझियम व पुना मर्कंटाईल बँक या त्यापैकीच काही संस्था आहेत. • मराठी ग्रंथात्तेजक मंडळी: • न्या. रानडे यांनी 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी' ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. • इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता. • रावजीशास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री तळेकर हे तिघेजण पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे सदस्य होते. • या संस्थेने पुणे येथे ग्रंथकारांचे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. • 800 लोक या संस्थेचे वर्गणीदार होते; परंतु प्रत्यक्षात दोन टक्के लोकांनीच वर्गणी भरलेली होती. • औद्योगिक चळवळीला प्रोत्साहन: • न्या. रानडे यांनी राजकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली. • त्यांनी हिंदी राजकारणाचा व औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घातला. • 1889 मध्ये त्यांनी पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थेची स्थापना केली. • त्यांनी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इ. स. 1890 मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. • प्रत्येक देशातील परिस्थितीप्रमाणे त्या देशाचे स्वतंत्र अर्थशास्त्र बनते, हे रानडे यांनी सिद्ध केले. • रानडेंची पुस्तके: • राईज ऑफ मराठा पॉवर • मिसेलनेअस राईटींग ऑफ मिस्टर जस्टिस रानडे • एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम. जी. रानडे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

राज्यसेवा - भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास सर्वांगीण विषय सराव चाचणी क्र. २०

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History (इतिहास) MPSC सराव प्रश्न

प्रसिद्ध संस्कृत व्याकरण पुस्तक 'महाभाष्य' कोणी लिहिले?

History (इतिहास) MPSC सराव प्रश्न

ब्रिटिश वसाहतवादी शासनांतर्गत भारताची व्यापार रचना ब्रिटनच्या आर्थिक हितांना सेवा देण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारताच्या व्यापार रचनेचे सर्वोत्तम वर्णन खालीलपैकी कोणते आहे?

History (इतिहास) MPSC सराव प्रश्न

1893 मध्ये, स्वामी विवेकानंदांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे ________ येथे अखिल जागतिक धार्मिक परिषदेत (धर्म संसद) भाग घेतला.

History (इतिहास) MPSC सराव प्रश्न

संगम साहित्याच्या संदर्भात खालील गोष्टी जुळवा. +-----+----------------+---+----------------+ | | यादी I | | यादी II | +-----+----------------+---+----------------+ | I | पलामोली | a | सीतनाई स्तनार | | II | शैवगा चिंतामणी | b | इलांगो अडिगल | | III | सिलप्पादिकरम | c | मुरुराई अरियार | | IV | मनिमेखलाई | d | तिरुत्तकदेवतार | +-----+----------------+---+----------------+

History (इतिहास) MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणत्या तत्त्वज्ञानाने असा दावा केला आहे की वासना आणि तृष्णा मानवी दुःखाच्या मुळाशी आहेत?