MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar समास
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो, तेव्हा कोणता समास होतो?

जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो, तेव्हा कोणता समास होतो?

पर्याय (Options):
A

द्वंद्व

B

बहुव्रीही

C

द्विगू

अचूक उत्तर (Official Answer)
D

अव्ययीभाव

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर **द्विगू** (पर्याय 3) हे आहे. **सविस्तर स्पष्टीकरण:** उत्तर - जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा द्विगू समास होतो. द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह Important Notes: समास - मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्या पासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस समास असे म्हणतात आणि अशा प्रकारे या झालेल्या संयुक्त शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात. मराठी व्याकरणात समासाचे एकूण चार प्रकार आहेत. • अव्ययीभाव समास - पहिले पद महत्वाचे • तत्पुरुष समास - दुसरे पद महत्वाचे • द्वंद्व समास - दोन्ही पदे महत्वाची • बहुव्रीहि समास - दोन्ही पदे गौण (तिसऱ्याच पदाचा बोध होतो) अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आमरण - मरेपर्यंत वरील उदाहरणात प्रति, यथा आ हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतात. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात. • विभक्ती तत्पुरुष समास • अलुक तत्पुरुष समास • उपपद तत्पुरुष समास • नञ तत्पुरुष समास • कर्मधारय तत्पुरुष समास • द्विगू समास • मध्यमपद लोपी समास द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. पापपुण्य - पाप आणि पुण्य व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात. • इतरेतर व्दंव्द समास • वैकल्पिक व्दंव्द समास • समाहार व्दंव्द समास इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रकार पडतात. • विभक्ती बहुव्रीही समास • नञ बहुव्रीही समास • सहबहुव्रीही समास • प्रादिबहुव्रीही समास विभक्ती बहुव्रीही समास - ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात. • समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. उदा. वक्रतुंड - वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो - गणपती (प्रथमा विभक्ती) • व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती) नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदा. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो सहबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. उदा. सवर्ण - वर्णासहित असा तो प्रादिबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. उदा. सुमंगल - पवित्र आहे असे **पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (द्वंद्व)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (बहुव्रीही)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (द्विगू)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. • **पर्याय 4 (अव्ययीभाव)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. **परीक्षेतील गुगली / चूक (Exam Trap):** परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. **स्मृती रूपक (Memory Booster):** संकल्पना सूत्र: द्विगू = पर्याय (3).
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

संकल्पना सूत्र: द्विगू = पर्याय (3).

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

**पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (द्वंद्व)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (बहुव्रीही)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (द्विगू)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. • **पर्याय 4 (अव्ययीभाव)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):