Marathi Grammar
शब्दांच्या जाती
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना ______ म्हणतात.
जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना ______ म्हणतात.
पर्याय (Options):
A
विशेषण
B
क्रियाविशेषण अव्यय
C
अचूक उत्तर (Official Answer)
शब्दयोगी अव्यय
D
उभयान्वयी अव्यय
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
शब्दयोगी अव्यय - जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
महत्त्वाची टीप:
शब्दयोगी अव्यये-
• शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात पण कधी कधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा लागतात.
• शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.
• शब्दयोगी अव्यय हे अव्यय असल्याने त्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
• शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होते.
शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पुढील प्रकार पडतात.
कालवाचक शब्दयोगी अव्यये - नंतर, पर्यंत, पावेतो, पुढे, पूर्वी, आधी
स्थलवाचक शब्दयोगी अव्यये - अलीकडे, आत, जवळ, ठायी, नजीक, पाशी, पुढे, बाहेर, मध्ये, मागे, समोर
करणवाचक शब्दयोगी अव्यये - कडून, करवी,करून, द्वारा, मुळे, योगे, हाती
संबंधवाचक शब्दयोगी अव्यये - विशी, विषयी
हेतुवाचक शब्दयोगी अव्यये - करिता, साठी, अर्थी, निमित्त
कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये - च, ना, मात्र, पण, केवळ
योग्यतावाचक शब्दयोगी अव्यये - समान, सम, योग्य, प्रमाणे, जोगा
तुलनावाचक शब्दयोगी अव्यये - पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यये - विना, खेरीज, वाचून, शिवाय
संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये - सुद्धा, देखील, बरीक, पण
साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये - संगे, सह, बरोबर, सकट, सहित, सवे, निशी
भागवाचक शब्दयोगी अव्यये - पैकी. पोटी, आतून
विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये - बद्दल, जागी, बदली, ऐवजी
दिकवाचक शब्दयोगी अव्यये - प्रत, प्रति, कडे, लागी
विरोधवाचक शब्दयोगी अव्यये - उलटे, उलट, वीण, विरुद्ध
परिणामवाचक शब्दयोगी अव्यये - भर
पूरक माहिती:
विशेषण – नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्यय - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.