Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'बाजी तया त्वरित धावुनि देइ हात ! जेव्हा पडे चतुरसालहि संकटांत। - प्रस्तुत पंक्तीत 'हात देणे' हा वाक्प्रचार कोणत्या अर्थाने आला आहे?
'बाजी तया त्वरित धावुनि देइ हात ! जेव्हा पडे चतुरसालहि संकटांत। - प्रस्तुत पंक्तीत 'हात देणे' हा वाक्प्रचार कोणत्या अर्थाने आला आहे?
पर्याय (Options):
A
लेखी बांधून घेणे
B
नशिबास दोष देणे
C
प्रहार करणे
D
अचूक उत्तर (Official Answer)
मदत करणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - प्रस्तुत पंक्तीत हात देणे हा वाक्प्रचार मदत करणे या अर्थाने आला आहे.
वाक्यात उपयोग - अनिलच्या संकटाच्या काळात त्याच्या अनेक मित्रांनी त्याला हात दिला.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• लेखी बांधून घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीची खात्री करून लेखी व्यवहार करणे होय.
• वाक्यात उपयोग - समीर आपला प्रत्येक व्यवहार लेखी बांधून घेत असे.
• नशिबास दोष देणे म्हणजे एखाद्या घटनेच्या अपयशासाठी किंवा दुर्दैवासाठी आपल्या स्वतःच्या कृतींऐवजी आपल्या भाग्याला जबाबदार धरणे होय.
• वाक्यात उपयोग - अखिल नेहमी अपयशासाठी आपल्या नशिबास दोष देत असे.
• प्रहार करणे म्हणजे आघात करणे होय.
• वाक्यात उपयोग - संसदेत नेत्यांनी एकमेकांविरोधात शाब्दिक प्रहार केला.