सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - सेवानिवृत्त - सेवा आणि निवृत्त हा सामासिक शब्दाचा चुकीचा विग्रह असणारा पर्याय आहे.
सेवानिवृत्त हे विभक्ती (पंचमी) तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.
विग्रह - सेवेतून निवृत्त
वरील सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून सेवानिवृत्त हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल.
विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. सूर्योदय - सूर्याचा उदय - षष्ठी तत्पुरुष समास
• भीमार्जुन - भीम आणि अर्जुन हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
• पंचपाळे - पाच पाळ्यांचा समूह हे द्विगू समासाचे उदाहरण आहे.
• साबुदाणावडा - साबुदाणा घालून केलेला वडा हे मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण आहे.
Important Notes:
तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
• विभक्ती तत्पुरुष समास
• अलुक तत्पुरुष समास
• उपपद तत्पुरुष समास
• नञ तत्पुरुष समास
• कर्मधारय तत्पुरुष समास
• द्विगू समास
• मध्यमपद लोपी समास
द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. पापपुण्य - पाप आणि पुण्य
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
• इतरेतर व्दंव्द समास
• वैकल्पिक व्दंव्द समास
• समाहार व्दंव्द समास
इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ
वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय
समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ