MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'स्वामी' कादंबरी कोणाची आहे?

'स्वामी' कादंबरी कोणाची आहे?

पर्याय (Options):
A

शंकर पाटील

B

जयवंत दळवी

C

रणजित देसाई

अचूक उत्तर (Official Answer)
D

ना. सी. फडके

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिली आहे. रणजित रामचंद्र देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. कांचनमृग, अभोगी, आषाढ, आलेख, कमोदिनी, गंधाली, कणव, जाण ही त्यांची काही पुस्तके आहेत. Related Concepts: • शंकर पाटील हे मराठी कथाकार होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. इल्लम, आभाळ, ऊन, खुशखरेदी, पाऊलवाटा, धिंड, बंधारा ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. • जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. अधांतरी, अंधाराच्या पारंब्या, अभिनेता, कवडसे, चक्र, घर कौलारू, दुर्गी, प्रदक्षिणा, बाकी शिल्लक, ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. • नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. अखेरचे बंड, अटकेपार, असाही एक त्रिकोण !, उद्धार, या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):