Marathi Grammar
समास
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
‘कथाकार व्रतस्थपणे आख्यान सांगत होता.' - अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करा.
‘कथाकार व्रतस्थपणे आख्यान सांगत होता.' - अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करा.
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
कथा करणारा
B
भजन गाणारा
C
कीर्तन करणारा
D
अभिनय करणारा
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - कथाकार या सामासिक शब्दाचा विग्रह कथा करणारा असा होईल.
कथाकार हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. या सामासिक शब्दात दुसरे पद प्रधान आहे व ते धातुसाधित आहे तसेच ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही म्हणून कथाकार हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल.
उपपद तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात. उदा. नीरज - नीरात जन्मलेले
Important Notes:
तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
• विभक्ती तत्पुरुष समास
• अलुक तत्पुरुष समास
• उपपद तत्पुरुष समास
• नञ तत्पुरुष समास
• कर्मधारय तत्पुरुष समास
• द्विगू समास
• मध्यमपद लोपी समास
विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. क्रीडांगण - क्रीडेसाठी आंगण - चतुर्थी तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास - ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. अग्रेसर, तोंडी लावणे
नञ तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद अ, अन, न, ना, बे, नि, गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरु होते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात. उदा. अनादर - आदर नसलेला, बेडर - डर नसलेला
कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते, यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. घनश्याम - घनासारखा श्याम, भाषांतर - अन्य भाषा
द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे