Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
‘आनंदाला पारावार न उरणे' म्हणजे _________
‘आनंदाला पारावार न उरणे' म्हणजे _________
पर्याय (Options):
A
मग्न होणे
B
आहारी जाणे
C
उत्साह निर्माण होणे
D
अचूक उत्तर (Official Answer)
खूप आनंद होणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - आनंदाला पारावार न उरणे म्हणजे खूप आनंद होणे होय.
वाक्यात उपयोग - सुमित यू.पी.एस.सी. परीक्षा पास झाल्यावर त्याच्या आईवडिलांचा आनंदाला पारावार उरला नाही.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• मग्न होणे म्हणजे तल्लीन होणे होय.
• वाक्यात उपयोग - गाण्याची आवड असल्याने अनिल नेहमी गाणे गाण्यात मग्न होत असे.
• आहारी जाणे म्हणजे पूर्णपणे स्वाधीन होणे होय.
• वाक्यात उपयोग - अवेळी जेवण, व्यायामाची कमतरता, फास्ट फूडच्या जास्त प्रमाणात आहारी जाणे या कारणामुळे माणसाला पोटाचे विकार होतात.
• उत्साह निर्माण होणे म्हणजे स्फूर्ती येणे होय.
• वाक्यात उपयोग - आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला मिळाल्याने आपल्यालामध्ये नेहमी उत्साह निर्माण होतो.