Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'तराळ अंतराळ' हे कोणाचे आत्मकथन आहे?
'तराळ अंतराळ' हे कोणाचे आत्मकथन आहे?
पर्याय (Options):
A
शरणकुमार लिंबाळे
B
दया पवार
C
श्री. म. माटे
D
अचूक उत्तर (Official Answer)
शंकरराव खरात
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - तराळ अंतराळ हे शंकरराव खरात यांचे आत्मकथन आहे.
शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. तराळ-अंतराळ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, माझं नाव ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत.
Related Concepts:
• प्रा. शरणकुमार लिंबाळे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या लिखाणाने त्यांनी दलित साहित्यात भर घातली आहे. उद्रेक, उपल्या, ओ, झुंड, गावकुसाबाहेरील कथा, दंगल, दलित पँथर, दलित प्रेमकविता, बहुजन, वादंग, भारतीय दलित साहित्य, राणीमाशी, पुन्हा अक्करमाशी ही त्यांची काही पुस्तके आहेत.
• दया पवार हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे. जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. कोंडवाडा (कवितासंग्रह), जागल्या (कथासंग्रह), चावडी (कथासंग्रह), बलुतं (आत्मकथन) ही त्यांची प्रकाशित साहित्य आहेत.
• श्रीपाद महादेव माटे हे मराठी लेखक होते. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात. रोहिणी या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनीच लिहिलेली २०० पानी प्रस्तावना खूप गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला. अनामिक, केसरी प्रबोध, भावनांचे पाझर, विचारमंथन, पक्षिकेचा वारा ही त्यांची काही पुस्तके आहेत.