MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar म्हणी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'कार्तिक बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा-बारा तास अभ्यास करत होता; प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले.' - या प्रसंगासाठी योग्य म्हण सुचवा.

'कार्तिक बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा-बारा तास अभ्यास करत होता; प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले.' - या प्रसंगासाठी योग्य म्हण सुचवा.

पर्याय (Options):
A

थेंबे थेंबे तळे साचे

B

डोंगर पोखरून उंदीर काढणे

अचूक उत्तर (Official Answer)
C

दैव देते कर्म नेते

D

झाकली मूठ सव्वा लाखाची

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - कार्तिक बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा-बारा तास अभ्यास करत होता; प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले या प्रसंगासाठी डोंगर पोखरून उंदीर काढणे ही योग्य म्हण होईल. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे जास्त श्रम करून कमी फायदा मिळणे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. Important Notes: • थेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ काटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते असा होतो. • दैव देते कर्म नेते या म्हणीचा अर्थ नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते असा होतो. • झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ व्यंग नेहमी झाकून ठेवावे असा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):