Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'स्वामी' ही कादंबरी कोणी लिहिली?
'स्वामी' ही कादंबरी कोणी लिहिली?
पर्याय (Options):
A
व्यंकटेश माडगूळकर
B
अचूक उत्तर (Official Answer)
रणजित देसाई
C
अण्णाभाऊ साठे
D
वि. वा. शिरवाडकर
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिली आहे.
रणजित रामचंद्र देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. अभोगी, आषाढ, आलेख, कमोदिनी, गंधाली, कणव, जाण ही त्यांची काही पुस्तके आहेत.
Related Concepts:
• व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. प्रवास एक लेखकाचा हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. कोवळे दिवस ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. उंबरठा, गावाकडच्या गोष्टी, ओझ, मी आणि माझा बाप, बनगरवाडी, वावटळ, सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकर यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. सत्तांतर या पुस्तकाला 1983 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
• तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (हिंदु) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. कापऱ्या चोर (लोकनाट्य), आबी (कथासंग्रह) फकिरा (कादंबरी), पाझर (कादंबरी), निखारा (कथासंग्रह) ही त्यांची काही पुस्तके आहेत.
• विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. १९७४ मध्ये विष्णु वामन शिरवाडकर यांना नटसम्राटसाठी मराठीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच १९८७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. अक्षरबाग, किनारा, चाफा, प्रवासी पक्षी हे त्यांचे काही कवितासंग्रह आहेत.