MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar वाक्यप्रकार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. आभाळ भरून आले. पावसाला सुरुवात झाली.

खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. आभाळ भरून आले. पावसाला सुरुवात झाली.

पर्याय (Options):
A

आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

अचूक उत्तर (Official Answer)
B

आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली.

C

आभाळ भरून आले पावसाला सुरुवात होईल?

D

आभाळ भरून आल्यावर पावसाला सुरुवात होईल.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली हे योग्य संयुक्त वाक्य होईल. पहिले वाक्य - आभाळ भरून आले. दुसरे वाक्य - पावसाला सुरुवात झाली. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला आहे म्हणून आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली हे योग्य संयुक्त वाक्य होईल. संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये • समुच्चयबोधक - आणि, व शिवाय, • विकल्पबोधक - अथवा, किंवा, की • न्यूनत्वबोधक - पण, परंतु परी • परिणामबोधक - म्हणून, सबब Important Notes: मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. • अर्थावरून पडणारे प्रकार • वाक्यात असणार्‍या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार - • विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे. • प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का? • उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी! • होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे. • नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही. वाक्यात असणार्‍या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार - • केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो. • संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो. • मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):