Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. जखमेवर मीठ चोळणे
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. जखमेवर मीठ चोळणे
पर्याय (Options):
A
मायेने सांभाळणे.
B
मन घट्ट करणे.
C
अचूक उत्तर (Official Answer)
उणिवेवर प्रहार करणे.
D
खूप कष्ट करणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रचाराचा अर्थ उणिवेवर प्रहार करणे हा होईल.
वाक्यात उपयोग - अमितने आपल्या मित्राच्या भावना समजून घेतल्या नाहीत पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यवस्थित केले.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• मायेने सांभाळणे म्हणजे प्रेमाने एखाद्या व्यक्तीची काळजी घेणे होय.
• वाक्यात उपयोग - आई आपल्या मुलाचा मायेने सांभाळ करते.
• मन घट्ट करणे म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करणे होय.
• वाक्यात उपयोग - शत्रूने अचानक केलेल्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी सर्व जवानांनी आपले मन घट्ट केले.
• खूप कष्ट करणे म्हणजे खूप मेहनत करणे होय.
• वाक्यात उपयोग - शेतकरी धान्य पिकवण्यासाठी शेतात नेहमी खूप कष्ट करत असे.