MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar म्हणी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दुरून डोंगर साजरे.

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दुरून डोंगर साजरे.

पर्याय (Options):
A

कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.

B

दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.

C

कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.

अचूक उत्तर (Official Answer)
D

पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - दुरून डोंगर साजरे या म्हणीचा योग्य अर्थ कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते हा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. Related Concepts: • पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो हा होतो. • पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे हा होतो. • पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच हा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):