Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'फकीरा' ही कादंबरी कोणी लिहिली?
'फकीरा' ही कादंबरी कोणी लिहिली?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
अण्णाभाऊ साठे
B
शिवाजी सावंत
C
पु. ल. देशपांडे
D
साने गुरूजी
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे.
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (हिंदु) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. कापऱ्या चोर (लोकनाट्य), आबी (कथासंग्रह) फकिरा (कादंबरी), पाझर (कादंबरी), निखारा (कथासंग्रह) ही त्यांची काही पुस्तके आहेत.
Related Concepts:
• शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. छावा (छत्रपती संभाजीच्या जीवनावरील कादंबरी), युगंधर श्रीकृष्ण: एक चिंतन, मृत्युंजय (महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी) ही शिवाजी सावंत यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
• पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. त्यांना 1965 साली व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. नस्ती उठाठेव, बटाट्याची चाळ, पुरचुंडी, गणगोत, भाग्यवान ही त्यांची काही पुस्तके आहेत.
• साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे. आस्तिक, आपण सारे भाऊ, अमोल गोष्टी, कावळे, उमाळा, करुणादेवी, तीन मुले ही त्यांची काही पुस्तके आहेत.