MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक कोणी लिहिले?

'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक कोणी लिहिले?

पर्याय (Options):
A

ना. स. इनामदार

B

महेश एलकुंचवार

C

विजय तेंडुलकर

D

वसंत कानेटकर

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांनी लिहिले. वसंत शंकर कानेटकर हे मराठी नाटककार होते. वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली. अखेरचा सवाल, अश्रूंची झाली फुले, आकाशमिठी, कधीतरी कोठेतरी, कस्तुरीमृग, गरुडझेप ही काही नाटके त्यांनी लिहिली आहेत. घर, पंख, पोरका, रमाई, तिथे चल राणी ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. Related Concepts: • ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव नागनाथ संतराम इनामदार असे आहे. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली पहिली कादंबरी होय. भूमीतरंग या नियतकालिकाचे ते संपादक होते. झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंबऱ्या आहेत. • भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. युगान्त या नाटकासाठी महेश एलकुंचवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 1984 मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित ‘पार्टी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. आत्मकथा, एका नटाचा मृत्यू, गार्बो, धर्मपुत्र, पार्टी, प्रतिबिंब, यातनाघर, रक्तपुष्प, वासनाकांड, वास्तुपुरुष, सोनाटा ही त्यांची काही नाटके आहेत. • विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले. लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):