MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs Famous People
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे __________ वर्षी झाला होता.

Raja Rammohan Roy was born in __________ at Radhanagar in Bengal Presidency.

पर्याय (Options):
A

1772

अचूक उत्तर (Official Answer)
B

1775

C

1773

D

1778

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर 1772 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1771 रोजी बंगाल प्रांतामधील राधानगर येथे झाला. • त्यांचे वडील रामकांतो रॉय हे वैष्णव होते, तर आई तारिणी शाक्त पार्श्वभूमीच्या होत्या. महत्त्वाची टीप: • राजा राम मोहन रॉय यांना उच्च शिक्षणासाठी पाटण्याला पाठवण्यात आले. वयाच्या पंधराव्या वर्षी राजा राममोहन रॉय यांनी बांगला, फारसी, अरबी आणि संस्कृत भाषा शिकल्या होत्या • राजा राममोहन रॉय मूर्तीपूजा आणि रूढीवादी हिंदू विधींच्या विरोधात होते. सर्व प्रकारच्या सामाजिक कट्टरता, रूढीवाद आणि अंधश्रद्धेच्या विरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. पण त्यांचे वडील रूढीवादी हिंदू ब्राह्मण होते. • पहिल्या भारतीय सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींपैकी एक असलेल्या ब्राह्मो समाजाचे ते संस्थापक होते. • राजा राममोहन रॉय एक महान विद्वान आणि स्वतंत्र विचारवंत होते. त्यांनी इंग्रजी, विज्ञान, पाश्चिमात्य वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची बाजू मांडली. त्यांना मुघल बादशहाने 'राजा' ही उपाधी दिली होती. • 1814 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. आत्मीय सभेने समाजात सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. • राजा राम मोहन रॉय यांनी विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार आणि महिलांना मालमत्ता ठेवण्याचा अधिकार यासह महिलांच्या हक्कांसाठी मोहीम राबवली. सती प्रथा आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेला त्यांनी सक्रीय विरोध केला. • शिक्षणाला, विशेषत: स्त्रियांच्या शिक्षणालाही त्यांनी पाठिंबा दिला. पारंपारिक भारतीय शिक्षणपद्धतीपेक्षा इंग्रजी भाषेचे शिक्षण श्रेष्ठ आहे, असे त्यांचे मत होते आणि संस्कृत शिकवणाऱ्या शाळांना आधार देण्यासाठी सरकारी निधीचा वापर करण्यास त्यांनी विरोध केला. • 1822 मध्ये त्यांनी इंग्रजी शिक्षणावर आधारित शाळेची स्थापना केली. • 1831 मध्ये राममोहन रॉय मुघल बादशहाचे राजदूत म्हणून आपल्या पेन्शन व भत्त्यांसाठी युनायटेड किंग्डमला गेले. • राजा राममोहन रॉय यांचे 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टलजवळील स्टॅपलटन येथे मेंदुज्वरामुळे निधन झाले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?