Marathi Grammar
समास
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'सूर्योदय' या समासाचा योग्य विग्रह करा.
'सूर्योदय' या समासाचा योग्य विग्रह करा.
पर्याय (Options):
A
सूर्य आणि उदय
B
सूर्य हाच उदय
C
अचूक उत्तर (Official Answer)
सूर्याचा उदय
D
उदय झाला आहे ज्याचा असा सूर्य
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - सूर्योदय या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह सूर्याचा उदय हा होईल.
सूर्योदय हे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.
वरील सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून सूर्योदय हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.
विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. क्रीडांगण - क्रीडेसाठी आंगण - चतुर्थी तत्पुरुष समास
Important Notes:
तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात.
• विभक्ती तत्पुरुष समास
• अलुक तत्पुरुष समास
• उपपद तत्पुरुष समास
• नञ तत्पुरुष समास
• कर्मधारय तत्पुरुष समास
• द्विगू समास
• मध्यमपद लोपी समास
• अलुक तत्पुरुष समास - ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. अग्रेसर, तोंडी लावणे
• उपपद तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात. उदा. नीरज - नीरात जन्मलेले
• नञ तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद अ, अन, न, ना, बे, नि, गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरु होते त्याला नञ तत्पुरुष समास म्हणतात. उदा. अनादर - आदर नसलेला, बेडर - डर नसलेला
• कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते, यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. घनश्याम - घनासारखा श्याम, भाषांतर - अन्य भाषा
• द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
• मध्यमपद लोपी समास - ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. उदा. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे