Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'रथचक्र' ही कादंबरी कोणाची ?
'रथचक्र' ही कादंबरी कोणाची ?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
श्री. ना. पेंडसे
B
रणजित देसाई
C
गंगाधर गाडगीळ
D
रंगनाथ पठारे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - रथचक्र ही कादंबरी श्री. ना. पेंडसे यांची आहे.
Important Notes:
• श्रीपाद नारायण पेंडसे हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते. मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले. रथचक्र ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.
• पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. एक होती आजी (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत.
Related Concepts:
• रणजित रामचंद्र देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. कांचनमृग, अभोगी, आषाढ, आलेख, कमोदिनी, गंधाली, कणव, जाण ही त्यांची काही पुस्तके आहेत.
• गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली. कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. एका मुंगीचे महाभारत या पुस्तकासाठी त्यांना इ.स. १९९६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अमृत, आठवण, उन्ह आणि पाऊस, काजवा, गुणाकार, नव्या वाटा, पाळणा, बंडू हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत.
• रंगनाथ गबाजी पठारे हे मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. त्यांना ताम्रपट या कादंबरीसाठी १९९९ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अनुभव विकणे आहे, गाभ्यातील प्रकाश हे त्यांचे कथासंग्रह आहेत तर कुंठेचा लोलक, चक्रव्यूह, टोकदार सावलीचे वर्तमान या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत.