Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा.
जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा.
पर्याय (Options):
A
भूमी
B
अचूक उत्तर (Official Answer)
चार नगरातले माझे विश्व
C
आलोक
D
बोलावे ते आम्ही
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव चार नगरातले माझे विश्व हे आहे.
Important Notes:
• डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत.
• डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
• अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, व्हायरस, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानाची गरुडझेप ही त्यांची काही विज्ञानावरची पुस्तके आहेत.
Related Concepts:
• आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
• आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.
• श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. ते सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.