MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्दांच्या जाती
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.

पर्याय (Options):
A

शी:! किती घाण आहे ही!

अचूक उत्तर (Official Answer)
B

बापरे! किती घाण आहे ही!

C

अबब! किती घाण आहे ही!

D

शाब्बास! किती घाण आहे ही!

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - शी:! किती घाण आहे ही! हे तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान होईल. शी:! किती घाण आहे ही! या वाक्यात शी हे तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरले आहे. Important Notes: केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्‍यय वाक्‍याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. केवलप्रयोगी अव्‍ययांना विभक्‍तीचे प्रत्‍यय लागत नाहीत. ते केवळ भावनेचे उद्गार असतात. केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात. केवलप्रयोगी अव्‍यय भावनाप्रधान असतात. केवलप्रयोगी अव्यये कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्यांचे खालील नऊ प्रकार पडतात. • तिरस्कारदर्शक - शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी • शोकदर्शक - आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे, शिव शिव, हरहर, देवा रे • आश्चर्यदर्शक - ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या • प्रशंसादर्शक - छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड, खाशी • संमतीदर्शक - ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा • हर्षदर्शक - अहाहा, आ-हा, वा, अहा, वा-वा, ओ-हो • संबोधनदर्शक - अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे • मौनदर्शक - चुप, चुपचाप, गप, गुपचुप • विरोधदर्शक - छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):