MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'स्मृतीचित्रे' हे आत्मचरीत्र कोणी लिहिले?

'स्मृतीचित्रे' हे आत्मचरीत्र कोणी लिहिले?

पर्याय (Options):
A

सुनिता देशपांडे

B

कुसुमावती देशपांडे

C

लक्ष्मीबाई टिळक

अचूक उत्तर (Official Answer)
D

बहिणाई चौधरी

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - स्मृतीचित्रे हे आत्मचरीत्र लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिले आहे. लक्ष्मीबाई टिळक या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते. वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. Related Concepts: • सुनीता देशपांडे पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती. आहे मनोहर तरी हे त्यांचे आत्मचरित्र आहे. प्रिय जी. ए हा त्यांचा पत्रसंग्रह आहे. • कुसुमावती देशपांडे या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. "पासंग" या १९५४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे. दीपकळी, दीपमाळ, मोळी, दीपदान, कुसुमानिल हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. • बहिणाबाई नथुजी चौधरी या मराठी कवयित्री होत्या. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):