MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar समास
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा समास ओळखा. मीठभाकर

खालील शब्दाचा समास ओळखा. मीठभाकर

पर्याय (Options):
A

अव्ययीभाव समास

B

तत्पुरुष समास

C

व्दिगू समास

D

द्वंद्व समास

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - मीठभाकर हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आणि ते समाहार द्वंद्व या उपप्रकारात मोडते. मीठभाकर या सामासिक शब्दात मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ यांचा अंतर्भाव होतो म्हणून हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. विग्रह - मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ Important Notes: द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. पापपुण्य - पाप आणि पुण्य व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात. • इतरेतर व्दंव्द समास • वैकल्पिक व्दंव्द समास • समाहार व्दंव्द समास इतरेतर द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.उदा. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आमरण - मरेपर्यंत वरील उदाहरणात प्रति, यथा आ हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतात. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात. • विभक्ती तत्पुरुष समास • अलुक तत्पुरुष समास • उपपद तत्पुरुष समास • नञ तत्पुरुष समास • कर्मधारय तत्पुरुष समास • द्विगू समास • मध्यमपद लोपी समास द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):