MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'युगंधर' ही कादंबरी कोणी लिहिली?

'युगंधर' ही कादंबरी कोणी लिहिली?

पर्याय (Options):
A

भैरप्पा

B

ना. सी. फडके

C

शिवाजी सावंत

अचूक उत्तर (Official Answer)
D

वि. स. खांडेकर

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - युगंधर ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. छावा (छत्रपती संभाजीच्या जीवनावरील कादंबरी), युगंधर श्रीकृष्ण: एक चिंतन, मृत्युंजय (महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी) ही शिवाजी सावंत यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. Related Concepts: • एस.एल. भैरप्पा हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबऱ्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो?’ यांसारखे वैचारिक ग्रंथ इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. • नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. अखेरचे बंड, अटकेपार, असाही एक त्रिकोण !, उद्धार, या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता. • विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. त्यांना ययाति या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अमृतवेल, अविनाश, अश्रू, कालची स्वप्ने, घरटे, झिमझिम, सुखाचा शोध ही त्यांची काही पुस्तके आहेत.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):