MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'भिजकी वही' हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणाचा?

'भिजकी वही' हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणाचा?

पर्याय (Options):
A

अरुण कोलटकर

अचूक उत्तर (Official Answer)
B

ग्रेस

C

विंदा करंदीकर

D

दिलीप चित्रे

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - भिजकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह अरुण कोलटकर यांचा आहे. अरुण बालकृष्ण कोलटकर हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते. अरुण कोलटकरच्या कविता, चिरीमिरी, द्रोण, अरुण कोलट्करच्या चार कविता हे त्यांचे प्रकाशित मराठी काव्यसंग्रह आहेत. कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश, जेजुरी, काळा घोडा पोएम्स हे त्यांचे प्रकाशित इंग्रजी काव्यसंग्रह आहेत. Related Concepts: • माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस हे मराठी कवी होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वाऱ्याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे. ओल्या वेळूची बासरी, कावळे उडाले स्वामी, चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम हे त्यांचे काही ललित लेखसंग्रह आहेत. बाई! जोगिया पुरुष, राजपुत्र आणि डार्लिंग, संध्याकाळच्या कविता, सांजभयाच्या साजणी, सांध्यपर्वातील वैष्णवी हे त्यांचे काही कवितासंग्रह आहेत. • गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. आदिमाया, संहिता हे त्यांचे संकलित काव्यसंग्रह आहेत. अजबखाना, अडम तडम, बागुलबोवा, राणीचा बाग, सर्कसवाला, सशाचे कान हे त्यांचे काही बालकविता संग्रह आहेत. आकाशाचा अर्थ, स्पर्शाची पालवी हे त्यांचे ललित निबंध आहेत. • दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी' मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत. एकूण कविता -१ काव्यसंग्रहासाठी त्यांना १९९४ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अभिरुची, मुंबई दिनांक, रविवार सकाळ, लोकसत्ता ही त्यांची स्तंभलेखन केलेली नियतकालिके आहेत.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):