Marathi Grammar
शब्दांच्या जाती
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.
पर्याय (Options):
A
गुलमोहर सुंदर आहे.
B
कैरी आंबट आहे.
C
अचूक उत्तर (Official Answer)
गोगलगाय हळूहळू चालते.
D
मला मोगरा आवडतो.
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - गोगलगाय हळूहळू चालते. हे क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान होईल.
गोगलगाय हळूहळू चालते या वाक्यात चालण्याची क्रिया नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी हळूहळू या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा वापर केला आहे.
हळूहळू हे रीतिवाचक क्रियाविशेषणाच्या प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय या प्रकारात मोडते.
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय - वाक्यामधील क्रिया नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात.
• प्रकारदर्शक - जलद, हळू, सावकाश, तेवी, जेवी, फुकट, व्यर्थ, उगीच, जसे, कसे तसे, असे, आपोआप इत्यादी
• अनुकरणदर्शक - सामान्यपणे ध्वनींची पुनरावृत्ती झालेली क्रियाविशेषण अव्यये या प्रकारात मोडतात. उदा. झटकन, पटकन, पटपट, चमचम, लकलक
• निश्चयदर्शक - खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.
Important Notes:
क्रियाविशेषण - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्ययांची दोन गटात विभागणी होते व आठ प्रकार मानले जातात.
• अर्थावरून पडणारे प्रकार
• स्वरूपावरून पडणारे प्रकार
अर्थावरून एकूण सहा प्रकार पडतात.
• कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
• स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
• रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
• परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
• प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
• निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
स्वरूपावरून एकूण दोन प्रकार पडतात.
• सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
• साधित क्रियाविशेषण अव्यय
Related Concepts:
• गुलमोहर सुंदर आहे या वाक्यात सुंदर हे विशेषण आहे.
• कैरी आंबट आहे या वाक्यात आंबट हे विशेषण आहे.