MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar समास
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र

खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र

पर्याय (Options):
A

तत्पुरुष समास

B

अव्ययीभाव समास

C

बहुव्रीही समास

D

व्दिगू समास

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर **व्दिगू समास** (पर्याय 4) हे आहे. **सविस्तर स्पष्टीकरण:** उत्तर - नवरात्र हे व्दिगू समासाचे उदाहरण आहे. नवरात्र - विग्रह - नऊ रात्रींचा समूह नवरात्र या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्याविशेषण आहे व या सामासिक शब्दातून रात्रींचा समुदाय सुचविला आहे म्हणून हे द्विगू समासाचे उदाहरण आहे. द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह Related Concepts: तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात. • विभक्ती तत्पुरुष समास • अलुक तत्पुरुष समास • उपपद तत्पुरुष समास • नञ तत्पुरुष समास • कर्मधारय तत्पुरुष समास • द्विगू समास • मध्यमपद लोपी समास अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा. प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला, यथाक्रम - क्रमाप्रमाणे, आमरण - मरेपर्यंत वरील उदाहरणात प्रति, यथा आ हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. उदा. दरसाल - प्रत्येक वर्षी, बेशक - शंकेशिवाय, बिनचूक - चुकीशिवाय मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे सुद्धा क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातत म्हणून हे शब्द अव्ययीभाव समास या प्रकारात मोडतात. उदा. पानोपानी - प्रत्येक पानात, दारोदार - प्रत्येक दारी बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रकार पडतात. • विभक्ती बहुव्रीही समास • नञ बहुव्रीही समास • सहबहुव्रीही समास • प्रादिबहुव्रीही समास विभक्ती बहुव्रीही समास - ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात. • समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. उदा. वक्रतुंड - वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो - गणपती (प्रथमा विभक्ती) • व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती) नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदा. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो सहबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. उदा. सवर्ण - वर्णासहित असा तो प्रादिबहुव्रीही समास - ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. उदा. सुमंगल - पवित्र आहे असे **पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (तत्पुरुष समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (अव्ययीभाव समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (बहुव्रीही समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (व्दिगू समास)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. **परीक्षेतील गुगली / चूक (Exam Trap):** परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. **स्मृती रूपक (Memory Booster):** संकल्पना सूत्र: व्दिगू समास = पर्याय (4).
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

संकल्पना सूत्र: व्दिगू समास = पर्याय (4).

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

**पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (तत्पुरुष समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 2 (अव्ययीभाव समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (बहुव्रीही समास)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (व्दिगू समास)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):