MPSC Test Logo mpsctest.in
Polity Constitutional Bodies
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारताच्या वित्त आयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 1. वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठीच्या आवश्यक पात्रता राष्ट्रपतीद्वारे निर्धारित केली जाते. 2. 1951 मध्ये पहिला वित्त आयोग घटित करण्यात आला होता. 3. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग घटित करतात. 4. वित्त आयोगाचा अध्यक्ष आपला अहवाल भारताच्या संसदेकडे सादर करतात.

Which of the following statements is/are correct about the Finance Commission of India? 1. The eligibility of members of the Finance Commission is determined by the President. 2. The First Finance Commission was constituted in 1951. 3. The President of India constitutes the Finance Commission every 5 years. 4. Chairman of Finance Commission submits his report to the Parliament of India.

पर्याय (Options):
A

केवळ 1 व 2

B

केवळ 2 व 3

अचूक उत्तर (Official Answer)
C

केवळ 3 व 4

D

केवळ 1 व 4

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
केवळ 2 व 3 हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • भारताचे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग घटित करतात. म्हणून, विधान (3) बरोबर आहे. • 1951 मध्ये, पहिला वित्त आयोग घटित करण्यात आला होता. म्हणून, विधान (2) बरोबर आहे. • वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठीच्या आवश्यक पात्रता बारतीय संसदेद्वारे निर्धारित केली जाते. म्हणून, विधान (1) बरोबर नाही. • वित्त आयोगाचा अध्यक्ष आपला अहवाल भारताच्या राष्ट्रपतीकडे सादर करतो. म्हणून, विधान (4) बरोबर नाही. • रचना: वित्त आयोगामध्ये अध्यक्ष आणि अन्य 4 सदस्य यांचा समावेश असतो. • पूढील गोष्टींसंबंधी राष्ट्रपतीला शिफारसी करणे हे आयोगाचे कर्तव्य असेल, त्या अशा: • संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये जे विभागून द्यावयाचे आहे किंवा विभागून देता येईल असे करांचे निव्वळ उत्पन्न त्यांच्यामध्ये वितरित करणे आणि राज्यांमध्ये अशा उत्पन्नातील त्यांचे हिस्से वाटून देणे; • भारताचा एकत्रित निधीतून द्यावयाची राज्य महसुलास सहायक अशी अनुदाने ज्यानुसार नियंत्रित व्हावीत ती तत्त्वे; • राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे राज्यातील पंचायती साधनसंपत्तीस पूरक ठराव्यात म्हणून राज्याच्या एकत्रित निधीत वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना; • राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे राज्याच्या नगरपालिकेच्या साधनसंपत्तीस पूरक ठराव्यात म्हणून राज्याच्या एकत्रित निधीत वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना; • आर्थिक स्थिती बळकट राहावी म्हणून राष्ट्रपतीने आयोगाकडे निर्देशिलेली अन्य कोणतीही बाब. • आयोगाकडे, आपली कार्यपद्धती ठरवील आणि आपली कार्ये पार पाडताना त्याला संसदेकडून कायद्याद्वारे प्रदान केले जातील असे अधिकार असतील. महत्त्वाची टीप: • चालू वित्त आयोग: 15 वा • अध्यक्ष: नंदकिशोर सिंह
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?