MPSC Test Logo mpsctest.in
Polity State Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राज्यांच्या महाधिवक्ताची नेमणूक कोण करते?

Who appoints the Advocate General of states?

पर्याय (Options):
A

राज्याचे मुख्यमंत्री

B

भारताचे राष्ट्रपती

C

राज्याचे राज्यपाल

अचूक उत्तर (Official Answer)
D

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर पर्याय 3 आहे म्हणजेच राज्याचे राज्यपाल. • राज्याचे महाधिवक्ता: • राज्यघटनेच्या अनुच्छेद 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्ता यांविषयी चर्चा केली आहे. • ते राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. • ते राज्य सरकारला सर्व कायदेशीर बाबींमध्ये मदत करतात. • प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे अशा व्यक्तीला राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करतील जो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यास पात्र असेल. • राज्यपालांच्या मर्जीनुसार महाधिवक्ता हे पद धारण करतील. • राज्यपालांनी ठरविल्यानुसारप्रमाणे त्यांना मोबदला मिळेल. • राज्याचे मुख्यमंत्री: भारतीय राज्याचा मुख्यमंत्री हा शासनाचा 'निर्वाचित' प्रमुख असतात आणि कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. • त्यांची नेमणूक संबंधित राज्यपाल करतात. • भारताचे राष्ट्रपती: ते भारतीय सैन्य दलांचे सरसेनापती असतात. • राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत. • तो भारताचा नागरिक असावा, • त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. • लोकसभेचे सदस्य होण्यासाठी त्याने पात्र असणे आवश्यक आहे. • केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधीन असलेले कोणतेही लाभ पद त्याने धारण करू नये. • राज्याचे राज्यपाल: • ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. • त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. • राज्यपाल होण्यासाठी त्यांचे वय किमान 35 वर्षे असणे आवश्यक आहे. • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश: • मुख्य न्यायाधीश तसेच संबंधित राज्याच्या राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात..
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?