MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

उद्देशिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या- 1. उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे. 2. 44 व्या संविधान दुरुस्ती कायदा, 1978 अन्वये, उद्देशिकेमध्ये 'एकात्मता' हा शब्द जोडण्यात आला आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

Consider the following statements about Preamble- 1. Preamble is a part of the constitution. 2. 'Integrity' word has been added to the Preamble by the 44^(th) Constitutional Amendment Act, 1978. Which of the above-mentioned statements is/are correct?

पर्याय (Options):
A

केवळ 1

अचूक उत्तर (Official Answer)
B

केवळ 2

C

1 आणि 2 दोन्ही

D

1 किंवा 2 कोणतेही नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
केवळ 1 हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • अमेरिकन संविधान हे पहिले असे संविधान होते, ज्याची सुरुवात उद्देशिकेने झाली होती. • भारतानेही या पद्धतीचे अनुसरण केले आहे. • प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञ एन. ए. पालखीवाला यांनी उद्देशिकेला संविधानाचे ओळखपत्र असे म्हटले आहे • केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका हा संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले होते. • म्हणून, विधान 1 योग्य आहे. • भारतीय संविधानाची उद्देशिका ही पंडित नेहरूंनी संविधान सभेत मांडलेल्या आणि संविधानाने स्वीकृत केलेलय उद्दिष्टांच्या ठरावावावर आधारित आहे. • 1976 च्या 42 व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे, यात केवळ एकदाच सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये पुढील तीन शब्द नव्याने जोडले गेले आहेत - समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. • म्हणून, पर्याय 2 अयोग्य आहे. • 26 नोव्हेंबर 1949 हा संविधान अंगीकृत करण्याचा दिनांक आहे. पूरक माहिती: • उद्देशिकेतील प्रमुख शब्द पुढीलप्रमाणे: • सार्वभौम • समाजवादी • धर्मनिरपेक्ष • लोकशाही • गणराज्य • न्याय • स्वातंत्र्य • समानता • बंधुता
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?