MPSC Test Logo mpsctest.in
Polity Local Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

महाराष्ट्रात कोणत्या समितीच्या शिफरशीवरून पंचायत राज ची सुरुवात करण्यात आली?

Panchayat Raj was started in Maharashtra on the recommendation of which committee?

पर्याय (Options):
A

बलवंतराय मेहता समिति

B

अशोक मेहता समिति

C

वसंतराव नाईक समिति

अचूक उत्तर (Official Answer)
D

यापैकी नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
वसंतराव नाईक समिति हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवशी महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्य निर्माण झाले. • महाराष्ट्र राज्याने 1961 मध्ये वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात पंचायतराजची सुरुवात करण्यात आली. • त्यानुसार महाराष्ट्र जि.प. व पं. समिती कायदा 1961 संमत करण्यात आला. त्यानुसार 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची सुरुवात करण्यात आली. पूरक माहिती: • महाराष्ट्र राज्यात पंचायत राज स्थापनेसंबंधी बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींची कशा प्रकारे अंमलबजावणी करता येईल याचा पुनर्विचार करण्याच्या उद्देशाने तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक समिती गठित करण्यात आली . • वसंतराव नाईक समितीने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्रा मध्ये पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीने स्थापन करता येईल यासंबंधी महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला असला तरी नाईक समितीने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या नाहीत तर महाराष्ट्रातील स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन मेहता समितीच्या शिफारशी मध्ये काही बदल नाईक समितीने सुचवले
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?