MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

आपल्याला नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या विभगात आढळतात?

In which Part of the Constitution of India we find the provisions relating to citizenship ?

पर्याय (Options):
A

विभाग I

B

विभाग II

अचूक उत्तर (Official Answer)
C

विभाग VII

D

विभाग IX

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
विभाग II हे उत्तर बरोबर आहे. • राज्यघटनेच्या केंद्रीय यादीमध्ये नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे, संसदेच्या विशेष न्यायप्रक्रीये अंतर्गत याचा अंतर्भाव होतो.. • राज्यघटनेमाध्ये 'नागरिक' या संकल्पनेची वेगळी व्याख्या केलेली नसली तरीही विभाग 2 (अनुच्छेद 5 ते 11) मध्ये नागरिकत्वाच्या शिर्षकाखाली असलेल्या लोकांच्या विविध वर्गांची तपशीलवार माहिती दिलेली आहे. • 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेतील इतर तरतुदींप्रमाणेच हे सर्व अनुच्छेद 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारल्यानंतर लागू करण्यात आले. • म्हणून पर्याय 2 बरोबर आहे. • भारतीय नागरिकत्व मिळवणे व संपुष्टात येणे • नागरिकत्व चार मार्गांनी मिळवता येते: जन्म, वंश, नोंदणी आणि नैसर्गिकरण. • नागरिकत्व कायदा 1955 मध्ये या सर्व तरतुदी नमूद केल्या आहेत. • जन्माने: • 26.01.1950 च्या नंतर परंतु 01. 07. 1987 च्या अस्धी भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या पालकांचे राष्ट्रीयत्व कुठलेही असले तरीही भारतीय असते. • 01.07.1987 आणि 02.12.2004 यांदरम्यान जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आई-वडील तिच्या जन्माच्या वेळी भारतीय असतील तरच ती भारताची नागरिक होऊ शकते. • 3.12.2004 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या दोन्ही पालकांपैकी किमान एक जण तिच्या जन्माच्या वेळी भारताचा नागरिक असल्यास व दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसल्यास जन्माला आलेली व्यक्ती भारताची नागरिक असते. • नोंदणी पद्धतीने: नोंदणी पद्धतीने देखील नागरिकत्व मिळवता येते. त्याचे काही अनिवार्य नियम असे आहेत: • नोंदणी अर्ज करण्याअगोदर व्यक्ती मूळ भारतीय आणि किमान 7 वर्षे भारताची रहिवासी असावी. • मूळ भारतीय असलेली परंतु अविभाजित भारताच्या बाहेरील कोणत्याही देशाची रहिवासी असलेली व्यक्ती. • भारतीय व्यक्तीशी विवाहबद्ध असलेली आणि नोंदणी अर्ज करण्यापूर्वी किमान 7 वर्षे भारताची रहिवासी असलेली व्यक्ती. • भारतीय नागरिकाची अल्पवयीन मुले. • वंश परंपरेने : • 10 डिसेंबर 1992 या दिवशी किंवा त्यानंतर व 3 डिसेंबर 2004 पूर्वी भारताबाहेर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या दोन्ही पालकांपैकी किमान एक जण भारताचा जन्मजात रहिवासी असल्यास ती व्यक्ती भारतीय असते. • जर एखादी व्यक्ती भारताबाहेर जन्माला आली असेल किंवा तिला 3 डिसेंबर 2004 नंतर नागरिकत्व मिळाले असेल तर त्याच्या/ तिच्या पालकांनी असे जाहीर करावे लागते की,सदर अल्पवयीन मुलाचे/ मुलीचे कोणत्याही इतर देशाचे पारपत्र नाही आणि तिच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत त्याच्या/ तिच्या जन्माची भारतीय वाणिज्य दूतावासात नोंद करण्यात आली आहे. • नैसर्गिकरणाने: • तो/ती 12 वर्षे भारताचा नागरिक असल्यास (नोंदणी अर्ज केलेल्या तारखेपासून सलग 12 महिने आणि एकूण 11 महिने) आणि नागरिकत्व कायद्याची सगळी पात्रता पूर्ण करणारी व्यक्ती. • हा कायदा दुहेरी नागरिकत्व किंवा दुहेरी राष्ट्रीयत्वाला पाठींबा देत नाही. हा केवळ वर उल्लेख केलेल्या तरतुदींमध्ये बसणाऱ्या व्यक्तींना पाठींबा देतो. उदा. जन्माने, वंशाने, नोंदणी पद्धतीने किंवा नैसर्गिकरणाने.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?