MPSC Test Logo mpsctest.in
Polity Central Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारताचा महान्यायवादी खालीलपैकी कोणाकडून नियुक्त केला जातो?

How is the Attorney General of India appointed?

पर्याय (Options):
A

संसदेकडून

B

राष्ट्रपतीकडून

अचूक उत्तर (Official Answer)
C

संसदेच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीकडून

D

सरन्यायाधीशाकडून

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
राष्ट्रपतीकडून हे योग्य उत्तर आहे. • भारतीय संविधानातील अनुच्छेद 76 (1) अन्वये, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्त करील. • भारताचे विद्यमान महान्यायवादी के. के. वेणुगोपाल हे आहेत. • भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची नियुक्ती केली होती. • त्यांनी 30 जून 2017 पासून आपला पदभार स्वीकारला. • भारत सरकारला त्यांच्याकडे संदर्भित कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी महान्यायवादी आवश्यक असतो. • तो राष्ट्रपतीने नियुक्त केलेली इतर कायदेशीर कर्तव्ये देखील पार पाडतो. • महान्यायवादीस भारतातील सर्व न्यायालयामध्ये भारत सरकारच्या वतीने उपस्थित राहण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकींसह सर्व कामकाजात भाग घेण्याचा व आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याला मतदानाचा अधिकार नसतो. महत्त्वाची टीप: • भारतीय संविधानात महान्यायवाद्याच्या पदावधी संदर्भात कोणताही उल्लेख आढळत नाही. • महान्यायवादी, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि त्यास, राष्ट्रपती निर्धारित करील असे परिश्रमिक मिळेल • महान्यायवादीस संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकींसह सर्व कामकाजात भाग घेण्याचा व आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. • महान्यायवादीस भारतातील सर्व न्यायालयामध्ये भारत सरकारच्या वतीने उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. • राष्ट्रपती, महान्यायवाद्याची (AG) नियुक्ती करतात. • सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशी व्यक्ती भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्त होण्यास पात्र असते. • म्हणजेच ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, आणि एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयांची निदान सलग पाच वर्ष न्यायाधीश असावी; किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग दहा वर्षे अधिवक्ता; किंवा राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता असावी.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?