MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय संविधानातील अनुच्छेद 51A मधील तरतूद कशाशी संबंधित आहे?

The provision under Article 51A of the Constitution of India relates to the :

पर्याय (Options):
A

नागरिकांसाठी समान नागरी कायदा

B

ग्रामपंचायतींचे संगठन

C

शिक्षणाचा अधिकार

D

मूलभूत कर्तव्ये

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
मूलभूत कर्तव्ये हे योग्य उत्तर आहे. • राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांमधील अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी संहितेचा समावेश आहे. पूरक माहिती: • भारतीय संविधानातील अनुच्छेद 40 मध्ये ग्रामपंचातींच्या संघठनाचा समावेश आहे. • भारतीय संविधानातील अनुच्छेद 21-A मध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण प्रदान करण्याचा समावेश आहे. • अनुच्छेद 51A मध्ये खालील मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे:- • संविधानाचे पालन करणे तसेच त्याचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. • आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करणे आणि त्यांचे अनुसरण करणे. • भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य आणि अखंडतेचे समर्थन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे. • देशाचे रक्षण करणे आणि असे आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा देण्यासाठी तत्पर असणे. • धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विविधतेच्या पलीकडे सर्व लोकांमध्ये सुसंवाद आणि बंधुता वाढवणे. • महिलांच्या सन्मानासाठी अपमानास्पद पद्धतींचा त्याग करणे. • आपल्या संस्कृतीचा आणि समृद्ध वारस्याचा सन्मान करणे व त्याचे जतन करणे • वन, तलाव, नद्या आणि वन्यजीव यासह नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण करणे व ते सुधारणे सजीव प्राण्यांबद्दल करुणा ठेवणे. • वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू आणि सुधारणावादी भावना विकसित करणे. • सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे. • वैयक्तिक आणि सामूहिक अशा सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेच्या दिशेने प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र निरंतर कर्तृत्वाच्या उच्च पातळीवर जाईल. • जर आपली मुले 6 ते 14 वर्षे वयोगटात असतील तर त्याच्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाच्या संधी प्रदान कराव्यात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?