MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

______ आणि ______ अल्पसंख्यांकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांची हमी देतात.

______ and ______ guarantee cultural and educational rights to minorities.

पर्याय (Options):
A

कलम 29 आणि 30

अचूक उत्तर (Official Answer)
B

कलम 350 A आणि 350 B

C

कलम 45 आणि 46

D

वरीलपैकी कोणतेही नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
अल्पसंख्यांक समुदायाची ओळख धर्म, भाषा लिपी आणि संस्कृतीच्या आधारे केली गेली आहे. घटनेतील विविध कलमे या समुदायांना त्यांची धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य देतात. कलम 29 आणि कलम 30 अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी काही सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांची हमी देतात. • कलम 29(1) अशी हमी देते की " भारताच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही भागाला त्या भागात असणारी भाषा,लिपी किंवा संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे." • कलम 29(2) अन्वये कोणालाही शैक्षणिक समानता नाकारली जाऊ शकत नाही ज्यानुसार राज्याद्वारे सांभाळलेल्या किंवा राज्य साहाय्य करत असलेल्या कोणत्याही संस्थेत वंश,जात,भाषा या आधारे कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. • कलम 29(3) यामध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही नागरिकांना राज्याने सांभाळलेल्या आणि केवळ धर्म, वंश, जाती, भाषा किंवा त्यापैकी कोणाच्याही आधारावर निधी किंवा मदत घेतलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्यास नाकारले जाऊ शकत नाही. • कलम 30 (1) धर्म किंवा भाषेवर आधारित असणार्‍या सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालविण्याचा अधिकार आहे. • कलम 30(2) हे कलम “धर्म किंवा भाषेवर आधारित असलेल्या, अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या अनुदानाच्या बाबतीत राज्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी भेदभाव करणार नाही” असे नमूद करते. म्हणूनच, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांची हमी देतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?