‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’: राज्यातील २ कोटी २५ लाख महिलांच्या खात्यात थेट ₹१,५०० चा मासिक हप्ता वर्ग
२१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांचे आर्थिक सक्षमीकरण; महिला बचत गटांच्या उत्पादनांना ई-कॉमर्स व्यासपीठ आणि बिनव्याजी कर्ज.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना दरमहा ₹१,५०० थेट आधार लिंक बँक खात्यात.
- योजनेमुळे महिलांचे पोषण, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणावरील घरगुती खर्चामध्ये लक्षणीय वाढ.
- बँकिंग करस्पॉन्डंट्स आणि महिला बचत गटांच्या मदतीने ग्रामीण भागात घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध.
- राज्यातील महिलांची बँकिंग प्रणालीतील सक्रिय भागीदारी ९०% च्या पुढे गेली.