MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Administrative Decision Making
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राणी आणि रमेश एक विवाहीत जोडपे होते. एके दिवशी ते रमेशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदाबर असून देखील तो लग्न समारंभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवुन त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी दयावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?

Rani and Ramesh was a married couple. One day they went for a wedding function of Ramesh's friend. Ramesh held a senior executive position in a Multinational Company still he completely involved in the marriage function and enjoyed with old friends. The next day Ritiesh Ramesh's classmate arrived his place and insisted Ramesh that use his power and appoint his brother in his company. Rani insisted Ramesh that take the huge amount and offer a small job. If you are in place of Ramesh what will you do?

पर्याय (Options):
A

रितेश चा भाऊ हा एक गरजू मुलगा आहे. माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्याला मी नोकरी देईन.

B

मी रितेश ला स्पष्टपणे सांगेल की, मी त्याच्या साठी असे काही ही करू शकत नाही.

C

मी राणीने सांगितलेली ऑफर मान्य करेल.

D

मी रितेश च्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र देण्यास सांगेल.

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय 4 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: दिलेले आहे: राणी आणि रमेश एक विवाहीत जोडपे होते. एके दिवशी ते रमेशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवुन त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी दयावी. उकल विधान: रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर असल्यामुळे, त्याने नैतिक नियमांचे पालन केले पाहिजे. वैयक्तिक संबंध किंवा आर्थिक लाभाच्या आधारावर कोणालाही कामावर घेणे हे व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे. म्हणून, रमेशने रितेशच्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र देण्यास सांगावे, जेणेकरून भरतीमध्ये निष्पक्षता सुनिश्चित होईल. ∴ योग्य उत्तर पर्याय (4) आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):