मंजुरीसाठी पाच खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. या आश्रमशाळांचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यातील सर्व सुविधा, पटसंख्या व प्रत्यक्षातील दैनंदिन उपस्थिती, नियमानुसार शिक्षकांच्या नेमणुका इत्यादींची परिस्थिती पाहून तुम्ही अहवाल देणार आहात. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती असे तुमच्या लक्षात आले. बारकाईने पाहताना तुम्हाला त्या इमारतीत सर्व विद्यार्थिनी खांद्यांत वाकून चालताना दिसल्या. एकाही मुलीला छताखाली ताठ उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणते निर्णय घ्याल ?
You want to survey five private residential Ashram Schools for approval. You are going to report on the existence of these Ashram Schools, their buildings, all their facilities, number of students and actual daily attendance, appointment of teachers as per rules, etc. You noticed that the accommodation facilities was very poor in one girl's school. You noticed that all the girls were walking with their shoulders bent. None of the girls could stand upright under the roof. What decision will you take?
दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे विचार करून शाळेला मंजुरी देईन.
'पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे' वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल असे स्पष्ट करेल.
सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन.
सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन. पण त्याच वेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते साहाय्य करेन.