MPSC Test Logo mpsctest.in
Economy Human Development Indices and Concepts
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) 2019 च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. (b) मानवी भांडवल निर्देशांक हा शून्य आणि एक यांच्या दरम्यान असतो.

Which of the following statements are correct? (a) The Human Capital Index (HCI) suggested in World Development Report - 2019 is measured in terms of the productivity of the next generation of workers. (b) HCI ranges between zero and one.

पर्याय (Options):
A

(a) फक्त बरोबर

B

(b) फक्त बरोबर

C

(a) आणि (b) दोन्हीही चूक

D

(a) आणि (b) दोन्हीही बरोबर

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर (a) आणि (b) दोन्हीही बरोबर हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: मानवी भांडवल निर्देशांक • जागतिक विकास अहवाल 2019 चा भाग म्हणून जागतिक बँकेने मानव भांडवल निर्देशांक (HCI) वर पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. • या वर्षीच्या जागतिक विकास अहवालाचा (WDR) विषय "कामाचे बदलते स्वरूप" हा आहे. • मानव भांडवल निर्देशांक (HCI) ने भारताला नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि बांगलादेश पेक्षा कमी म्हणजे 115 व्या स्थानावर ठेवले आहे. • मानवी भांडवल निर्देशांकात शिक्षण आणि आरोग्य निर्देशकांमधील परिणाम आणि भविष्यातील उत्पादकतेवर होणार्‍या परिणामांच्या आधरावर 157 देशांना क्रमबद्ध करण्यात येते. त्यामुळे विधान (a) योग्य आहे. • मूल्यमापन केली जाणारी प्रमुख क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: • 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर • गुणवत्ता-समायोजित शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे • पुढील दोन निकषांवरून आरोग्यदायी वातावरण ठरवले जाते. • 5 वर्षांखालील बालकांसाठी कुंठन दर. • प्रौढ आयुर्मानोत्तर जीवनप्रमाण आणि • मानव भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 मधली संख्या आहे जी आता जन्मलेल्या बालकांची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत अपेक्षित उत्पादकता दर्शवते. त्यामुळे विधान (b) योग्य आहे. • मानव भांडवल निर्देशांकातील 157 देशांपैकी मानव भांडवल निर्देशांक मूल्य 0.44 सह भारत 115व्या क्रमांकावर आहे.. • सिंगापूर 0.88 मूल्यासह HCI यादीत अव्वल आहे म्हणून, पर्याय 4 योग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?