MPSC Test Logo mpsctest.in
History National movement (1919 - 1939)
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खाली काही ऐतिहासिक घटना खाली दिल्या आहेत. P: सायमन कमिशन Q: लाहोर अधिवेशन R: भारत सरकार अधिनियम, 1919 S: चंपारण्य सत्याग्रह वरील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.

Some Historical Events are given below: P: Simon Commission Q: Lahore Session R: GoI Act 1919 S: Champaran Satyagraha Arrange them according to the year of the event.

पर्याय (Options):
A

R → S → P → Q

B

S → R → P → Q

अचूक उत्तर (Official Answer)
C

Q → S → P → R

D

S → R → Q → P

E

वगळा

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर S → R → P → Q हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • चंपारण्य सत्याग्रह 1917: • या सत्याग्रहाचा मुख्य मुद्दा तीनकाठिया पद्धतीच्या (एकूण जमिनीच्या 3/20वा भाग) अंतर्गत निळीची लागवड हा होता. • गांधींनी त्या अधिकाऱ्यांचे मन वळवले आणि या पद्धतीचा अंत केला. • मागणी मान्य करून 25% नुकसान भरपाई देण्यात आली. • गांधीजींद्वारे भारतात हाती घेतलेला हा पहिला सत्याग्रह होता. • शेतकऱ्यांच्या असंतोषास भारताच्या राष्ट्रीय चळवळीस जोडणे हा चंपारण्य सत्याग्रहाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. • भारत सरकार अधिनियम, 1919: • या अधिनियमास माँटेग्यू-चेम्सफर्ड कायदा असेही म्हणतात. • भारताच्या सरकारमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी यास पारित करण्यात आले होते • या अधिनियमाने मुख्य प्रांतांना दुहेरी स्वरूपाचे सरकार ("द्विदल राज्यपद्धति") प्रदान केले. • द्विदल राज्यपद्धति म्हणजे सरकारांचा दुहेरी समूह; या राज्यपद्धतीमध्ये एक समूह उत्तरदायी असतो तर दुसरा समूह उत्तरदायी नसतो. • या अधिनियमानुसार व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील सहा सदस्यांपैकी तीन (कमांडर-इन-चीफ व्यतिरिक्त) भारतीय असणे आवश्यक होते. • सायमन कमिशन 1928: • हा 1928 मध्ये घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी युनायटेड किंगडमच्या संसदेच्या सात ब्रिटिश सदस्यांचा भारतात आलेला एक गट होता. • भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या सायमन कमिशनमध्ये एकाही भारतीय सदस्याचा समावेश नसल्याने भारतातील लोक संतापले होते. • सायमन कमिशनमध्ये भारतीय सदस्य नसल्यामुळे भारतातील लोकांनी सायमन कमिशनच्या आगमनाविरोधात आंदोलन केले होते. • लाहोर अधिवेशन 1929: • पूर्ण स्वराजच्या जाहीरनाम्यास भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा म्हणूनही ओळखले जाते. • 1929 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या प्रभावाखाली लाहोर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने याची घोषणा केली होती. • ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वराज्य मिळवण्यासाठी लढा देणे हा या जाहीरनाम्याचा उद्देश होता. • 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरमध्ये या जाहीरनाम्याची घोषणा करताना गांधींनी भारताचा ध्वज फडकावला होता. • या जाहिरनाम्यामध्ये 26 जानेवारी हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. • भारताचा ध्वज संपूर्ण भारतात सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?