MPSC Test Logo mpsctest.in
History Other Dimensions
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? (a) शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी 1944 मध्ये लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली होती. (b) 1972 साली स्थापन झालेल्या दलित पॅंथर या संघटनेत अण्णा भाऊ साठे यांचे योगदान होते. (c) अण्णा भाऊ साठे यांना दलित समाजातील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जाते. (d) अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली छक्कड ही लावणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणागीत ठरली . पर्यायी उत्तरे:

Which of the following statements is false? (a) Shaheer Anna Bhau Sathe founded Lal Bavata troupe in 1944 to promote the Communist Party. (b) Anna Bhau Sathe contributed to the organization Dalit Panther which was established in 1972. (c) Anna Bhau Sathe is known as the first journalist of the Dalit community. (d) Lavani Chakkad written by Anna Bhau Sathe became the inspiration song of the United Maharashtra movement. Alternative Answers:

पर्याय (Options):
A

(a), (b), (c) आणि (d)

B

केवळ (a) आणि (c)

C

केवळ (b) आणि (c)

अचूक उत्तर (Official Answer)
D

केवळ (a) आणि (d)

E

वगळा

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर पर्याय 3 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: शाहीर अण्णा भाऊ साठे (1920-1969): • अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. • अण्णाभाऊ साठे हे दलित समाजातील पहिले लेखक होते. • अमरशेख यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे शाहिरी केली. • त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता. • गिरणी कामगारांच्या कामामुळे त्यांचा साम्यवादी चळवळीशी संबंध आला. • भटक्या समाजाचे प्रश्न अण्णाभाऊंनी अत्यंत आत्मीयतेने कथा व कादंबऱ्यांतून मांडले. • 'स्मशानातील सोने' ही त्यांची महत्त्वाची कथा आहे. • 'फकिरा' ही त्यांची सर्वोत्तम कादंबरी असून वास्तव, आदर्श, स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीत आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून अस्सल दलित जीवन मांडले. • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी (त्याला छक्कड म्हणतात) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत ठरले. • ती छक्कड म्हणजे 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली' अशी होती. • या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. म्हणून विधान (d) बरोबर आहे. • उत्कृष्ट तमाशा कलावंत म्हणून देखील त्यांनी नाव कमावले. त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. • कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचारासाठी आपल्या कलेचा उपयोग व्हावा म्हणून अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, व शाहीर गव्हाणकर यांनी 1944 मध्ये 'लाल बावटा' कलापथकाची स्थापना केली. म्हणून विधान (a) बरोबर आहे. • लालबावटा कलापथकासाठी त्यांनी अनेक लावण्या, पोवाडे व वगनाट्ये लिहिली. या पथकाच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे मोठे कार्य केले. • कादंबऱ्या- फकिरा, वारणेचा वाघ, अलगुज, चित्रा. इ. • त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला होता. तिला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना होती. या कादंबरीत वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले आहे. • कथा- कृष्णकाठच्या कथा, गजाआड, बंदुका, बरबाद्या बंजारी. ठासलेल्या • वगनाट्य- अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापऱ्या - चोर. • पोवाडा व लावण्या- स्टॅलिनग्राडचा पोवाडा, 'माझी मैना गावाकडे राहिली'. लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा: • गोपळबाबा वलंगकर हे दलित समाजातील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात. म्हणून विधान (c) चुकीचे आहे. • दलित पॅंथर संघटनेची स्थापना 1972 मध्ये झाली होती, तर अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यू 1972 मध्ये झाला होता. म्हणून विधान (b) चुकीचे आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

History MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा नव्हत्या? 1. सरोजिनी नायडू 2. ॲनी बेझंट 3. नेली सेनगुप्ता 4. कमलादेवी चट्टोपाध्याय खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

History MPSC सराव प्रश्न

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या: I. त्यांच्या मनात पौर्वात्य पारंपरिक तत्त्वज्ञान पद्धतींबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. II. आपल्या देशवासियांनी बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच सर्व स्त्री-पुरुषांची मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

History MPSC सराव प्रश्न

सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?

History MPSC सराव प्रश्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात "पूर्ण स्वराज" चा ठराव मंजूर करण्यात आला?

History MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?