MPSC Test Logo mpsctest.in
polity Central Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

केंद्रीय मंत्री परिषदेत किती मंत्र्यांचा समावेश असू शकतो?

How many ministers can be included in the council of Ministers of the Union?

पर्याय (Options):
A

लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के

B

लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या पन्नास टक्के

C

भारताच्या पंतप्रधानांच्या मर्जीनुसार

D

लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या पंधरा टक्के

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
लोकसभेतील एकूण सदस्यांच्या संख्येच्या पंधरा टक्के हे अचूक उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • 91वा घटना दुरुस्ती कायदा, 2003: • पक्षांतर करणाऱ्यांना सार्वजनिक पदांपासून दूर ठेवण्यासाठी, आणि पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करण्यासाठी, मंत्री परिषदेचा आकार मर्यादित करण्यासाठी खालील तरतूद केलेली आहे: • केंद्रीय मंत्रीमंडळातील पंतप्रधानांसह, एकूण मंत्र्यांची संख्या, लोकसभेतील एकूण सदस्यांच्या संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. म्हणून, पर्याय 4 अचूक आहे. • कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित, पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेला सदस्य जरी तो संसदेच्या कोणत्याही सदनाचा सदस्य असेल तरी देखील मंत्री म्हणून नियुक्त होण्यास अपात्र ठरतो. • राज्यातील मंत्रिमंडळातील, मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधान सभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. पण, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी नसावी. • घटनेचे कलम 74 मंत्रीपरिषदेच्या स्थितीशी संबंधित आहे तर कलम 75 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाल, जबाबदारी, पात्रता, शपथ, आणि मानधन आणि भत्ते यांचा समावेश असतो. • COM मध्ये तीन प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश असतो, म्हणजेच कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री, आणि उपमंत्री. या सर्व मंत्र्यांच्या उच्च स्थानी पंतप्रधान असतात. पूरक माहिती: भाग V मधील कलम 74 पासून 78 पर्यंत विस्तृतरीत्या केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहे +-----+----------------------------------------------------------------+ | कलम | स्पष्टीकरण | +-----+----------------------------------------------------------------+ | 74 | राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यसाठी मंत्री परिषद | | 75 | मंत्र्यांसाठीच्या इतर तरतुदी | | 77 | भारत सरकारच्या व्यवसायाचे संचालन | | 78 | राष्ट्रपतींना माहिती देणे इत्यादी. बाबत पंतप्रधानांची कर्तव्ये | | 88 | सदनांच्या संबंधित मंत्र्यांचे अधिकार | +-----+----------------------------------------------------------------+
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):