MPSC Test Logo mpsctest.in
polity State Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार कोणाला आहे?

Who has the power to recommend for the imposition of Constitutional Emergency in a state?

पर्याय (Options):
A

भारताचे उपराष्ट्रपती

B

भारताचे पंतप्रधान

C

भारताचे गृहमंत्री

D

संबंधित राज्याचे राज्यपाल

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
संबंधित राज्याचे राज्यपाल हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • राज्याच्या राज्यपालांना राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी लागू करण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार आहे. • जेव्हा एखाद्या राज्याच्या राज्यपालाला असे वाटते की, राज्यघटनेनुसार राज्य चालवले जाऊ शकत नाही, तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 अन्वये राष्ट्रपतींद्वारे घटनात्मक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी लादली जाऊ शकते . • राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतींना घटनात्मक आणीबाणी लागू करण्याची शिफारस करु शकतात. घटनात्मक आणीबाणी आवश्यक असल्याबाबत राष्ट्रपती समाधानी असतील, तर ते तशी घोषणा जारी करू शकतात. पूरक माहिती: • भारतीय राज्यघटनेच्या भाग XVIII मधील, अनुच्छेद 352 ते 360 हे आणीबाणीच्या तरतुदींशी संबंधित आहे. • राज्यघटनेत तीन प्रकारच्या आणीबाणी नमूद आहेत. • राष्ट्रीय आणीबाणी: अनुच्छेद 352 अन्वये, भारताच्या किंवा भारताच्या अंतर्गत भागाच्या सुरक्षेला युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरीमुळे धोका असल्यास राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करु शकतात. • राष्ट्रपती राजवट: अनुच्छेद 356, राज्यघटनेतील तरतुदींनुसार राज्य सरकार चालवता येत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास ते याप्रकारची उद्घोषणा जारी करू शकतात. • आर्थिक आणीबाणी: भारताची आर्थिक स्थिरता किंवा पत धोक्यात आली आहे अशी परिस्थिती उद्भवली आहे, याबाबत राष्ट्रपतींची खात्री झाल्यास, राष्ट्रपती अनुच्छेद 360 अन्वये, आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):