MPSC Test Logo mpsctest.in
polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय राज्यघटनेतील कोणती दुरुस्ती उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राचा केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तार करण्याशी संबंधित आहे?

Which amendment in the Indian constitution is related to extension of jurisdiction of High Courts to Union territories?

पर्याय (Options):
A

नववी घटनादुरुस्ती

B

सातवी घटनादुरुस्ती

अचूक उत्तर (Official Answer)
C

पहिली घटनादुरुस्ती

D

तेरावी घटनादुरुस्ती

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
7वी घटनादुरुस्ती हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: 7वी घटनादुरुस्ती अधिनियम (1956): • राज्याचे पूर्वीचे चार वर्गीकरण रद्द केले. • उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांपर्यंत वाढवले. • 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामाईक न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली. • उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त कार्यवाहक न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद केली. पूरक माहिती: 1ली घटनादुरुस्ती अधिनियम (1951): • भारतातील भूमिसुधारणा सुलभ करण्यासाठी हे महत्त्वाचे होते. • मालमत्तेचे अधिग्रहण आणि इतर भूमिसुधारणांशी संबंधित कायदे न्यायालयीन तपासणीपासून वाचविण्यासाठी अनुच्छेद 31A आणि अनुच्छेद 31B जोडले गेले. • राज्याला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याचे अधिकार दिले. • मालमत्तेच्या संपादनाची तरतूद करणारे कायदे वाचविण्याची तरतूद करणायात आली, इत्यादी. • न्यायालयीन पुनरावलोकनाच्या स्वरूपात समाविष्ट भूमिसुधारणा आणि इतर कायद्यांचे संरक्षण करण्यासाठी नवव्या अनुसूचीची भर घातली गेली. • सार्वजनिक सुव्यवस्था, परकीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि एखाद्या गुन्ह्याला चिथावणी देणे या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधांची आणखी तीन कारणे जोडली गेली. तसेच हे निर्बंध वाजवी आणि न्याय्य बनवले गेले. • परंतु कोणत्याही राज्याने कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायाचे राज्य व्यापार आणि राष्ट्रीयीकरण व्यापार किंवा व्यवसायाच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव ते अवैध ठरणार नाही. 13वी घटनादुरुस्ती अधिनियम (1962): • नागालँडला राज्याचा दर्जा देऊन त्यासाठी विशेष तरतूद केली. 9वी घटनादुरुस्ती अधिनियम (1960): • यात प्रामुख्याने भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेचे फेर-समायोजन करण्यात आले. • बेरुबारी युनियनच्या अधिसूचनेची सोय करण्यात आली.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):